Breaking News

परिवर्तन घोटाळाप्रकरणी संचालक अर्जुन होके गजाआड; माजलगावात केली परिवर्तन घोटाळाप्रकरणी संचालक अर्जुन होके गजाआड; माजलगावात केली अटकमाजलगाव (प्रतिनिधी)- ठेवीदाराच्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी परिवर्तन मल्टीस्टेट चे उपाध्यक्ष अर्जुन मनोहर होके यास शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने त्यांच्या शेतातून अटक केली. माजलगाव येथील परिवर्तन मल्टी स्टेट या संस्थेतील ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी काही महिन्यापूर्वी जिल्ह्यात विविध ठिकाणी चेअरमन विजया झेंडे यांच्यासह ३६ जनावर गुन्हे दाखल आहेत. यातील तीन आरोपींना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे.

तर आलं झेंडे सह उर्वरित संचालक फरार असल्याने बीड आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस त्यांचा शोध घेत होते. पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांना शनिवारी परिवर्तन च्या उपाध्यक्ष अर्जुन होके हा शेतात लपून बसला असल्याची माहिती मिळाली त्यावरून दुपारी तिथे छापा टाकला व अटक केली. या पथकात भाऊसाहेब चव्हाण, संजय पवार, ननावरे यांचा समावेश होता. दरम्यान चेअरमन विजय अलझेंडे यास अटक करण्यात यावी अशी मागणी ठेवीदारांमध्ये होत आहे