Breaking News

दिपावली, पाडवा निमित्त तलवाडा येथील शिवसेना भवनात गोड फराळीचा कार्यक्रम संपन्न


तलवाडा (प्रतिनिधी)- गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे सेनेचे गटनेते गोविंद जोशी यांचे निवासस्थानी शिवसेना भवन येते दीपावली व पाडवा निमित्त गोड फराळाचे आयोजन काल शुक्रवार रोजी करण्यात आले होते हा कार्यक्रम सेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित जि प सदस्य युवराज डोंगरे तालुकाप्रमुख कालिदास नवले सभापती अभिजीत पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी हजारो लोकांनी आस्वादाचा आनंद घेतला.यावर्षी मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात दुष्काळाची गडद छाया असताना पोटापाण्यासाठी अनेकांनी स्थलांतर केलेल्या आहे यातच या सणाला अनेक गोरगरिबांच्या घरी दिवाळी साजरी झालीच नाही परंतु तलवाडा येथील शिवसेनेचे गटनेते गोविंद जोशी यांनी काल शुक्रवारी हजारो लोकांचा गोड स्वयंपाक बनवुन सर्व जाती-धर्मांच्या बरोबर हा सण साजरा केला या कार्यक्रमाला सर्व जाती-धर्माचे लोक व अनेकांनी हजेरी लावली गट नेते गोविंद जोशी यांनी या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत एकतेचा संदेश दिला अशी प्रतिक्रिया येणार्‍या प्रत्येक जण व्यक्त करत होता या कार्यक्रमाला तलवाडा गेवराई तालुक्यातील अनेकांनी हजेरी लावली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना तलवाडा सर्कल प्रमुख शेख रफीक यांनी मोलाचे सहकार्य केले.