Breaking News

सदर बाजार ते पोलिस कॉलनी रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावा


आंबाजोगाई, (प्रतिनिधी):- शहरातील मध्यभागी असलेल्या ठिकाणचा रस्ता सदर बाजार ते पोलिस कॉलनी हा अतिशय खराब झाला असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देवून तो तात्काळ बनवावा अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे यांच्यासह शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. शहरातील सदर बाजार ते पोलिस कॉलनी हा रस्ता नागरिकांसाठी महत्वाचा भाग आहे. 

दळवळणासाठी या रस्त्याचा नागरिक वापर करत असतात. शहराच्या मध्यभागी वस्तीमध्ये असलेला हा रस्ता दुर्लक्षीत असून या रस्त्याची अतिशय बिकट परिस्थिती बनली आहे. वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे लक्ष देवून तो तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी लोकजनशक्तीपार्टीचे राजेश वाहुळे यांच्यासह शिष्टमंडळाने केली.