भाजपविरोधात महाआघाडी? चंद्राबाबू, पवार, फारुक अब्दुलांचा पुढाकार


नवीदिल्लीः लोकसभेच्या 2019 मधील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाआघाडी स्थापन करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा एन. चंद्रबाबू नायडू यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांची भेट घेतली. नायडू यांची दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावर काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीचीही भेट घेऊन राजकीय स्थितीवर चर्चा केली.

या वेळी झालेल्या चर्चेेत भाजप विरोधात इतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. भाजपचे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे. त्यासाठी देश आणि देशाचे भविष्य वाचविण्याबाबत आम्ही शरद पवार आणि फारुक अब्दुल्ला यांच्याची चर्चा केली आहे, असे चंद्रबाबू नायडू यांनी म्हटले आहे. भाजप विरोधात सर्व पक्षांनी एकत्र आघाडी स्थापन करणार असल्याचे नायडू यांनी याआधी संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी पुढाकार घेत हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप विरोधात महायुती तयार करण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जात आहे. अब्दुल्ला यांनी म्हटले आहे, की, देश कठीण परिस्थितीतून जात आहे. सीबीआयमध्ये काय चालले आहे हे सर्वांना माहीत आहे. देशातील जनता आणि लोकशाही संकटात आहे. पवार, नायडू यांना भेटून सध्याच्या स्थितीवर काय उपाय काढता येईल, यावर चर्चा झाली आहे.


नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. आम्ही भूतकाळ विसरलो आहोत. देशाच्या भविष्याचा विचार करून आम्ही एकत्र आलो आहोत. सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे नायडू यांनी गांधी यांच्या भेट घेतल्यानंतर म्हटले आहे.

विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज : राहुल 

नायडू यांच्या बरोबर आज सकारात्मक चर्चा झाली. आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे राहूल गांधी यांनी म्हटले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget