Breaking News

श्रीगोंदा पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी अमोल गव्हाणे बिनविरोध...


श्रीगोंदा/प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुका पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारी चे तालुका प्रतिनिधी अमोल गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी आमीन शेख, मुश्ताक पठाण यांची निवड करण्यात आली. बाळासाहेब काकडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदावर ही निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.

यावेळी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. गव्हाणे हे गत दशकापासून पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते उच्चशिक्षित असून द्वि पद्धविसह पत्रकारितेची पदवी देखील त्यांनी मिळवली आहे. अध्यक्षपदासाठी सर्वानुमते त्यांचे नाव सुचविण्यात आले. नूतन कार्यकारिणीत मीरा शिंदे यांना कार्याध्यक्ष, अमिनभाई शेख व मुस्ताक पठाण यांना उपाध्यक्ष नेमण्यात आले. गणेश कविटकर यांना सरचिटणीस तर सुहास कुलकर्णी यांची खजिनदारपदी निवड केली गेली. यावेळी पत्रकारांशी निगडित विविध विषय व प्रश्‍नावर ज्येष्ठ पत्रकार व सकाळ चे प्रतिनिधी संजय काटे यांनी मार्गदर्शन केले. कर्जतचे ज्येष्ठ पत्रकार गणेश जेवरे, आरीफभाई शेख यावेळी हजर होते.
बाळासाहेब काकडे यांनी सर्वांचे आभार मानले. संतोष गोरखे व अमोल उदमले यांनी सूत्रसंचालन केले.