उपनगराध्यक्ष हेमंत क्षिरसागर यांनी व्यापार्‍यांच्या समस्या सोडविल्या; सुभाष रोड वरील बॅरेकेट्स बसवायला सुरूवात


बीड (प्रतिनिधी) - शहरातील सुभाष रोडवर मध्यभागी सिमेंटचे ठोकळे बसवण्यात आलेले आहेत. ते काढण्यात यावेत अशी मागणी नागरीकांसह शहरातील व्यापारी बांधवांकडून होत होती. सदर ठोकळ्याच्या जागी बॅरेकेट्स बसवायला सुरुवात करण्यात आली आहे. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून माळीवेस पर्यंत हे बॅरेकेट्स बसवले जाणार आहेत. दरम्यान सुभाष रोडवरील व्यापारी बांधवांच्या घंटागाडी, पाणी, स्वच्छता, वीज व इतर अडचणी संदर्भात समस्या समजावून घेत त्या तात्काळ सोडवण्या संदर्भात उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी पालिका प्रशासनाला सूचना केल्या. 

गुरुवार दि.२९ नोव्हेंबर रोजी पालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने शहरातील सुभाष रोडवर मध्यभागी सिमेंटचे ठोकळे असलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स बसवायला सुरुवात करण्यात आली. हे बॅरेकेट बसवत असतांना सुभाष रोडच्या व्यापारी बांधवांच्या अडचणी यावेळी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर ऐकुन घेतल्या. त्याच बरोबर व्यापारी बांधवांच्या इतर समस्यांचे देखील तात्काळ निराकरण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिल्या. यावेळी अभय समदरीया, बाबुराव राऊत, सुहास मुनोत, नामदेव जाधव, शेख लईकभाई, राजुसेठ मुनोत, जीवन जोगदंड, उदय जोगदंड, ऍड. बाळासाहेब राख, रामेश्वर घोडके यांच्यासह या प्रभागाचे नगरसेवक शेख अमेरअण्णा आदी व्यापारी बांधवांची उपस्थिती होती. यावेळी व्यापारी बांधवांनी आपल्या अडचणी, समस्या उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या कानी टाकल्यानंतर त्यांनी त्या तात्काळ सोडवण्या संदर्भात पालिका प्रशासनाला सुचना केल्या. या प्रसंगी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे, बांधकाम विभागाचे व स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget