ना.विखेंचा ताफा अडविला देवळाली प्रवरात निषेध

राहुरी/प्रतिनिधी 
जायकवाडीला पाणी सोडू नये म्हणून हायकोर्टात पद्मश्री विखे कारखान्याने याचिका दाखल करून पाणी सोडण्यास स्थगिती मिळवली असता मराठवाड्यातील काही लोकांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा आडविण्याचा जो प्रयत्न केला त्याचा काल(बुधवार) देवळाली प्रवरा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने निषेध करण्यात आला.

नगर जिल्ह्यातील हक्काचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला असता लोणी येथील पद्मश्री विखे पाटिल कारखान्याने पाणी सोडू नये म्हणुन उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पाणी सोडण्यास स्थागिती मिळवली. दरम्यान काँग्रेसतर्फे राज्यभरात जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. मंगळवारी (ता.30) फुलंब्री, सिल्लोड येथे ही यात्रा जाणार होती. यात्रेसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार अब्दुल सत्तार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे आले होते. तत्पूर्वी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी ते थांबले होते. भोजन झाल्यानंतर फुलंब्रीला जाण्यासाठी जात असताना राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा मराठवाड्यातील काही लोकांनी अडविण्याचा प्रयत्न केला.या घटनेचा व प्रवृत्तीचा देवळाली प्रवरा बाजारतळ येथे जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य गणेश भांड, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लोंढे, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, उत्तम कडू, माजी नगरसेवक वैभव गिरमे, बाबा भिंंगारे, भाऊसाहेब होले, दत्तात्रय दळवी, पिनु लोंढे, बाळासाहेब पठारे, अलम शेख, नितीन आढाव,पाराजी चव्हाण, कुणाल पाटिल, शुभम पाटिल, ऋषि राऊत, कैलास सांगळे, गणेश देशमुख, किशोर साळुंके, सौरभ घोलप, नीलेश कराळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget