विद्यार्थ्यासह अन्य एकावर हल्ला


माजलगाव, (प्रतिनिधी):- मागील भांडणाची कुरापत काढून दहा ते अकरा जण एकास मारहाण करत असतांना त्यांच्यातील वाद सोडविण्यास गेलेल्या एका विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याची घटना खरात आडगाव फाट्यावर घडली. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरुन अकरा जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव फाट्यावर दि.२६ ऑक्टोबर रोजी दहा ते अकरा जणांनी एसटी बस अडवून त्यातील एका व्यक्तीस शिवीगाळ करत भांडण करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी किरण अनिल कावळे (वय २४, रा.सोनाथडी) हा विद्यार्थी भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यातीलच काही जणांनी तु मध्ये का आलास, तुला जिवे मारतो असे म्हणत त्याच्या डोक्यात काठीने मारहाण केली. या प्रकारामुळे किरण कावळे हे रक्तबंबाळ झाले. यावेळी दहा ते अकरा जणांनी विद्यार्थ्यासह अन्य एकास गजाने व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. मारहाणीच्या भितीने दोघेही पळून जात असतांना मारहाण करणार्‍या आठ ते दहा जणांनी पाठीमागून दगड फेकून मारले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget