Breaking News

कारवाईच्या लेखी आश्‍वासना नंतर स्वाभिमानीचे आंदोलन स्थगित

चिखली,(प्रतिननिधी): ग्राहकांना अवास्थव व चुकीने आलेले विद्युत बीले दुरूस्त करण्यात येवून संबंधीत ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याशिवाय शाखा अभियंता चिंचोकर यांच्यावर कारवाई करण्यास संदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. असे लेखी पत्र दिल्यानंतरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयात सुरू केलेले आंदोलन स्थगीत केले.

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते मयूर बोर्डे यांच्या नेतृत्वात 26 नोव्हेंबर रोजी चिखली येथील महावितरणच्या कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन केले होते. महावितरणच्या चिखली कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे विज ग्राहक त्रस्त झाले होते. ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विज बीले देणे. घर बंद असतानांही वाढीव बील देणे, प्रत्यक्ष मिटर रिडींग न घेता एका ठिकाणी बसून बिले तयार करणे असा प्रकार संबंधीत ठेकेदाराने सुरू केला होता. यामध्ये महावितरणचे अधिकारी सुध्दा या ठेकेदाराला पाठीशी घालत होते. त्यामुळे अनेक ग्राहकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत स्वाभिमानीचे युवा नेते मयुर बोर्डे यांच्या नेतृत्वात मागील आठ दिवसापूर्वी महावितरणच्या अधिकार्‍याला घेराव घालण्यात आला होता. त्यावेळी अधिकार्‍यांनी कारवाईचे आश्‍वास दिले होते. तथापि कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. अखेर मयुर बोर्डे यांच्या नेतृत्वात 26 नोव्हेंबर रोजी महावितरणच्या कार्यालया कार्यकर्त्यांनी ठ्ठीया मांडून बोंबाबोंब आंदोलन सुरू केले. दरम्यान जोपर्यंत संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करून ठेकेदारावर गुन्हे दाखल करणार नाही, ग्राहकांना बिले दुरुस्त करून नवीन बिले तात्काळ देण्यात यावे व लाच मागणार्‍या अधिकार्‍याला निलंबित करणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा मयुर बोर्डे व त्यांच्या पदाधिकर्‍यांनी घेतल्याने अधिकारी चांगलेच अडचणीत आले. अखेर उपकार्यकारी अभियंता यांनी कारवाईचे लेखी आश्‍वासन बोर्डे यांना दिले. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ग्राहकांना अवास्थव व चुकीने आलेले विद्युत बीले दुरूस्त करण्यात येवून संबंधीत ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.याशिवाय शाखा अभियंता चिंचोळकर यांच्यावर कारवाई करण्यास संदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. वरिष्ठांनी सदर विषय गंभीरपणे घेतला असून लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल. 

या लेखी आश्‍वासनानंतर मयुर बोर्डे यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र 7 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास पुन्हा स्वाभिमानीच्या वतीने आक्रमकरित्या महावितरणच्या कार्यालयावर रुम्हणे मोर्चा काढण्यात येईल असा इशारा युवा नेते मयुर बोर्डे यांनी दिला.या आंदोलनात तालुकाध्यक्ष भारत वाघमारे, युवा नेते नितीन राजपूत, युवा तालुकाध्यक्ष भागवत म्हस्के, गोपाल ढोरे, अनिल खरात, अमोल तेलनग्रे, महाले सर, विकास मघाडे, उषाबाई गाडे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित आहे.