‘सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते – दानवे


‘सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते,’ असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलाय. पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीनं आयोजित अटल संकल्प महासंमेलनात ते बोलत होते.

'सिंचन घोटाळ्याप्रकरणी पोलीस अजित पवारांच्या अगदी दारापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते,' असा दावा रावसाहेब दानवेंकडून करण्यात आलाय.राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आघाडी सरकारच्या काळात भाजपकडून सिंचन घोटाळ्याचे मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते. तसंच याप्रकरणात आमच्याकडे बैलगाडीभर पुरावे आहेत, असा दावाही भाजपकडून करण्यात आला होता. आम्ही सत्तेत आल्यानंतर अजित पवारांना जेलमध्ये टाकू, अशी वक्तव्य भाजपच्या अनेक नेत्यांनी केली होती.

आता राज्यातील भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केल्याने एकच खळबळ माजली आहे. सिंचन प्रकरणात अजित पवारांवर खरंच काही कारवाई होणार, की भाजपसाठी हा फक्त निवडणुकांसाठीचा मुद्दा आहे, हे पाहावं लागेल.Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget