Breaking News

सरदार पटेल यांनी कधीच धर्मांधतेला थारा दिला नाही : राहुल गांधी


नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. सरदार पटेल हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. दृढ इच्छाशक्ती असलेल्या पटेल यांनी असहिष्णूता व धार्मिक कट्टरतावादाला कधीही थारा दिला नसल्याचे ते म्हणाले. सरदार पटेल हे खरे देशभक्त होते.

 त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले. भारताची एकसंधता आणि धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिल्याचे ते म्हणाले. सरदार पटेल यांचा जन्म गुजरातमधील नादिआड येथे 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला होता. ते भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री होते. स्वातंत्र्यानंतर विविध संस्थानांचे भारतात विलिनीकरण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.