संचालक मंडळ बरखास्त करण्याची जिल्हा उपनिबंधकाची नोटीस


अंबेजोगाई (प्रतिनिधी)- मोंढा यार्डात व्यापारासाठी दिलेल्या भूखंडावर संचालकांनी बंगले बांधले, संचालकांनी मागितलेली माहिती न देणे ,तसेच नवीन परवाने न देणे ,शेतकर्यासाठी असलेली तारण योजना राबवणे ,रस्ते सुधार योजनेचा निधी असूनही खर्च न करणे यासह अनेक अनागोंदी कारभाराचा चौकशी अहवाल अंबेजोगाईचे सहायक निबंधकांनी दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधक ,बीड यांनी संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावून आपले संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक का नेमु नये ? यासंदर्भात संचालकांनी आपले म्हणणे १५ नोव्हेंबरपर्यंत मांडण्याची संधी दिली आहे. अंबेजोगाई ची मार्केट कमेटी राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे कॉंग्रेस पक्षाचे संचालक किशोर परदेशी, प्रताप आपेट (भाजप) तसेच इतरांनी मार्केट कमिटीचे संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारा विरुद्ध जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रारी केल्या होत्या या सर्व तक्रारीची चौकशी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश सहाय्यक निबंधक पोतंगले यांना दिल्यानंतर त्यांनी आपला अहवाल जिल्हा उपनिबंधक यांना सादर केला 

तसेच इतर तक्रारदाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळाला संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात का येऊ नये ? अशी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ माजली आहे जिल्हा उपनिबंधकांनी मार्केट कमेटीच्या संचालक मंडळावर ठपका ठेवलाय त्यात सर्व सुविधा उपलब्ध असूनही तारण योजना सुरू न करणे, पणन मंडळातर्फे विविध विकास योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध असूनही खर्च करणे ,वजन काटा योजना अमलात आणावी अशा शासनाच्या सक्त सूचना असूनही अमलबजावणी न करणे, संचालकांनी मार्केट यार्डात घरे बांधली मार्केट यार्डात पोटभाडेकरू ठेवून लाखो रुपये भाडे वसूल केले जाते ,एमआयडीसीतील गाळ्यावर व्यापार्‍याचे अतिक्रमण भाडे वसुली नाही, बर्‍याच व्यापार्‍यांना लायसन दिले जात नाही, लायसन नसलेल्यांना पट्टी बुक दिले जातात, संचालकांना प्रोसिडिंगची नक्कल दिली जात नाही असे दहा गंभीर मुद्द्यावर जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या नोटिसचे उत्तर संचालक मंडळ काय देते यावर बरेच अवलंबून असल्याचे दिसते विशेष म्हणजे संचालक मंडळाला बरखास्त का करू नये ही जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या नोटीसमध्ये विद्यमान संचालक राजकुमार गंगणे हे दुसर्‍याच्या प्लॉटमध्ये आडत्याचा व्यवसाय करतात त्याच ठिकाणी मागील बाजूस त्यांचे राहते घर आहे त्यांच्याविरुद्ध उपविधीतील तरतुदीनुसार कार्यवाही करणे अपेक्षित असताना का केली नाही तसेच दुसरे संचालक भन्साळी यांचे अतिक्रमणासंदर्भात न्यायालयात विलंबाबाबत अपील करणे उचित असताना मार्केट कमिटी ने कार्यवाही केली नसल्याचे म्हटले आहे या दोन संचालकामुळे अख्खे संचालक मंडळ अडचणीत आल्याची चर्चा होत आहे

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget