भकास जंगलामुळे वन्यजीव सैरभैर; पाणवठे कोरडे, वनविभाग उदासीन


कुळधरण/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी, कोपर्डी, धालवडी, दूरगाव, गुंडाचीवाडी आदी भागातील वनक्षेत्रात झालेल्या वृक्षतोडीने जंगले भकास झाली आहेत. विरळ जंगलामुळे वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. त्यामुळे वन्यप्राणी चारा, पाण्याच्या शोधार्थ सैरभैर झाले आहेत. कर्जत तालुक्यातील प श्‍चिम भागात मोठे वनक्षेत्र आहे. मात्र वनविभागाच्या दुर्लक्षामुळे येथील जंगलात मोठया प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. जंगलात मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने झाडा-झुडपांची वाट लागली आहे. वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट झाल्याने हे प्राणी आडोसा शोधताना दिसतात. चारा पाण्याच्या शोधात ह रिण, काळविटे शेतात येतात व त्यांची शिकार साधली जाते. उन्हाच्या झळांनी व्याकूळ झालेली हरणे, काळविटे, ससे, लांडगे, कोल्हे आदी प्राणी उजाड माळरानावर सैरभैर धावताना दिसतात. पुरेशा पावसाअभावी चार्‍याचा प्रश्‍न बिकट आहे. तसेच पाणी नसल्याने या वन्यप्रांण्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

पाणवठे कोरडे
वनक्षेत्रात अनेक ठिकाणी पाणवठे बांधण्यात आले असून हातपंप बसवण्यात आले आहेत. मात्र वनमजुरांच्या दुर्लक्षामुळे पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी मैलोन मैल धावत आहेत.

पर्यावरणाचे संवर्धन गरजेचे
वनक्षेत्रही पशुपक्षांना सुरक्षित राहिलेली नाहीत. पर्यावरणाचे संवर्धन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. कर्जत तालुक्यात रेहेकुरी व इतरत्र असणार्‍या वनक्षेत्रातील जैवविविधता जपणे महत्वाचे आहे.
- प्रा.संदीप भिसे,
डॉ.जी. डी. सप्तर्षी कॉलेज, खेड

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget