Breaking News

मराठा आरक्षण विरोध नाही : भुजबळ

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, मुळच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. एसइबीसी आणि ओबीसी हा एकच प्रवर्ग आहे. घटनेत ओबीसी हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे सरकारने आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
अजित पवारांबद्दलच्या आरोपांवर प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, अजित पवारांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र सादर करणे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना त्रास देण्याचा हेतू आहे. या कारवाईतून सरकारचा हेतू स्पष्ट होत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.