Breaking News

शेवटच्या श्‍वासापर्यंत आई-वडीलांची जाणीव ठेवा : भास्करगिरी महाराज


नेवासा/प्रतिनिधी
श्री क्षेत्र देवगडचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या बुलढाणा जिल्हयातील पिंप्राळा येथे सोमवारी दि 29 ऑक्टोबर रोजी आयोजित मातृपूजन संत पूजन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जग दाखविणार्‍या आई वडिलांची जाणीव शेवटच्या श्‍वासापर्यंत ठेवा, त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका
असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले. 

यावेळी पिंप्राळा येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री प.पू. सरूबाई पाटील यांच्या 91 व्या जन्मदिनानिमित्ताने सौरी विधान पूजन, पुन्याह वाचन, मातृका पूजन, आयुष्य मंत्र जप, मांगलीक औक्षण करण्यात आले. यावेळी झालेल्या धार्मिक विधीचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न आचार्य गणेशदेवा कुलकर्णी यांनी केले. यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज, महंत शंकरगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, हभप तुकाराम बाबा, महंत ओंकारगिरी महाराज, माणिक महाराज, आ. फुंडकर, हभप सोपान महाराज, हभप नाना महाराज उजवणे, हभप मोतीराम महाराज, हभप जनार्धन महाराज, हभप रमेश महाराज, हभप गोपाळ महाराज यांच्यासह सर्व संत महंतांच्या हस्ते मातोश्री सरूबाई पाटील यांचा गौरव करण्यात आला. यानिमित्ताने गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते विविध देवस्थानसाठी निधी देण्यात आला. व मातोश्रीचे पूजन करण्यात आला. यावेळी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की मातोश्री सरूबाई पाटील यांनी 91 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने पिंप्राळा गावी जेष्ठ व संत महंतांचे पूजन व्हावे अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे 2011 पासून त्यांच्याजवळ जी माधुकरी जमा झाली. त्यातून हा सोहळा देवकार्य व समाजकार्य समजून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 मुले मोठी झाल्यानंतर इस्टेट घेतात मात्र आई वडिलांनी दिलेले संस्कार घेत नाही. त्यामुळे विपरीत परिणाम होतात, ज्या आईवडीलांनी आपल्याला जग दाखविले त्यांची जाणीव ठेवली पाहीजे, आपल्या देशात वृद्धाश्रम निघणे ही चांगली गोष्ट नाही म्हणून आईवडिलांची सेवा करून महान असलेल्या भारतीय संस्कृतीचा विचार दृढ करावा, शेवटच्या श्‍वासापर्यंत आईवडिलांची सेवा करून देशात राष्ट्रीय एकात्मता व बंधुभाव दृढ होण्यासाठी प्रयत्न करावा, देशाचे वैभव डोलाइमान ठेवण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी मधुकरराव पेसोडे, हभप बाळू महाराज कानडे, संचालक बाळासाहेब पाटील, अजय साबळे, भीमाशंकर वरखडे, प्रशांतभाऊ निपुंगे, आण्णा साबळे, राम विधाते, तात्या महाराज शिंदे, संदीप साबळे, चावरे, हभप लक्ष्मीनारायण जोंधळे, हभप नारायण महाराज ससे, हभप पंढरीनाथ मिस्तरी, आदिनाथ रौदळ, मनोज पवार, गणेश पेसोडे, रमेश पेसोडे, तेजराव पाटील, सुधाकर साबे, बंटी पठाडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांना यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.