सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी


संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ’राष्ट्रीय एकता दिवस शपथ ग्रहण कार्यक्रम ’ संपन्न्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य .देशमुख यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी बोलताना देशमुख यांनी प्रतिपादन केले की, सरदार पटेल यांनी राष्ट्रीय एकता, सुरक्षितता यासाठी केलेले कार्य विचारात घेऊन आपल्या देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा राखण्यासाठी स्वतःला समर्पित करा आणि हा संदेश आपल्या देशबांधवामध्ये पसरविण्यासाठी भरपूर प्रयत्न करा. असा मोलाचा संदेश दिला. तसेच समृध्द आणि सशक्त भारताची निर्मिती हेच सरदार वल्लभभाई पटेल यांचे उद्दष्टि होते. सरदार पटेल यांच्या स्वप्नातील आदर्श भारत उभारणीसाठी राष्ट्रीय एकात्मता महत्त्वाची आहे. त्यामुळे आज आपण सर्वांनी त्यांचे गुण आत्मसात करण्याचा आणि नव्या समृध्द भारताचे त्यांचे स्वप्न पुर्ण करुन देशाला सुराज्याकडे नेण्याचा संकल्प करु या असेही ते यावेळी म्हणाले. संतोष फापाळे म्हणाले की, आपण संयुक्त प्रयत्नातून देशाला उन्नतीकडे नेऊ शकतो, पण आपल्यात जर एकात्मतेचा अभाव असेल तर तो आपल्याला नव्या संकटात लोटू शकतो हे भविष्यदर्शी विचार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुरदर्शीपणाचे आणि व्यक्तिमत्वाचे निदर्शक आहेत. त्यांच्यापाशी संघटनकौशल्य होते तसेच ते उत्तम प्रशासक देखील होते. यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप फलफले यांनी केले तर आभार डॉ. सचिन कदम यांनी मानले या कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध शाखांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget