Breaking News

खुल्या टेनिस बॉंल क्रिकेट स्पर्धेचे जयसिंह सोंळके यांच्या हस्ते उदघाटन


माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील उमरी येथे दरवर्षी दिपावली निमित्त खुल्या टेनिस बॉंल ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या ही वर्षी जयसिंह सोंळके युवा मंच ने आयोजन केले होते या स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा जि.प.सदस्य जयसिंह सोंळके यांच्या हास्ते दि.३ रोजी करण्यात आले. स्पर्धेत प्रथम पारितोषिक २११११रु.द्वितीय पारितोषिक १११११रू .ठेवले आसुन या स्पर्धेला तालुक्यातुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आसुन परळी पाथरी, सिरसाळा ,तेलगाव, माजलगाव सह ग्रामीण भागातील ४०संघाने सहभाग घेतला आहे.आजुन ही या स्पर्धेत सहभाग घ्यायचा आसेल तर त्या संघानी संयोजकाशी संपर्क साधावा आसे आहवान करण्यात आले आहे. या वेळी जि.प.सदस्य रामप्रभु साळुंके, युवराज ठोंबरे,आसाराम घायतिडक, मथुरादास घायतिडक, राजाभाऊ घायतिडक,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डाके, गिरे, नगरसेवक राहुल लंगडे, विजय शिंदे, लखन थावरे,बाळासाहेब काळे ,प्रशांत शेटे,सरपंच भिमराव लांडगे यांची उपस्थिती होते.