Breaking News

लिफ्ट घेणाऱ्या भामट्यांनी दुचाकीस्वार तरुणाला लुबाडले

ठाणे : प्रतिनिधी

दुचाकीवरून जाताना अनोळखी व्यक्तीस लिफ्ट दिल्याचा फटका दुचाकीस्वाराला बसला आहे.सुरेश कुंभार (23) रा.पवई असे लुबाडणूक झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी परतताना वागळे इस्टेट रोड नं.16 येथे एका व्यक्तीने आपणास चेकनाका येथे सोडण्याची विनंती केली.त्यानुसार,माणुसकी दाखवत कुंभार यांनी त्या व्यक्तीला मदत करण्याच्या उद्देशाने लिफ्ट दिली.दरम्यान,चेकनाका येथे पोहचल्यावर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या भामट्याने धमकावत कुंभार यांचा मोबाईल व पैशाचे पाकीट असा तब्बल सहा हजारांचा मुद्देमाल हिसकावून पाठीमागून आलेल्या दुसऱ्या साथीदाराच्या दुचाकीवरून धूम ठोकली.पळताना या भामट्याने कुंभार यांच्या दुचाकीची स्टार्टर केबल तोडून दुचाकीचेही नुकसान केले.याप्रकरणी,श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे