रिपब्लिकन सेनेच्या निमंत्रकपदी दिलीप खरात यांची निवड


देऊळगाव राजा,(प्रतिनिधी): रिब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेकर यांनी नुकतीच बुलडाणा जिल्हा कार्याकारणी व आघाड्या बरखास्त करुन नविन कार्याकरणी घोषीत करीत देऊळगावराजा तालुक्यातील युवा नेते भाई दिलीप खरात यांची बुलडाणा जिल्हा रिब्लिकन सेनेच्या जिल्हा निमंत्रक पदवार नियुक्ती केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेत खिंडार पडले होते.

येणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेकर यांच्या आदेशाने विदर्भ प्रमुख योगेंद्र चवरे, विदर्भ सरचिटणीस जयकुमार चौरपगार आणि गजानन तेलगोटे यांनी एका पत्रकाद्वारे बुलडाणा जिल्हा कार्याकारणी व आघाड्या बरखास्त केली. तसेच रिपब्लिकन सेना येणार्या निवडणुकात बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा जोमाने कार्य करण्यासाठी देऊळगावराजा तालुक्यातील भाई दिलीप खरात यांची बुलडाणा जिल्हा निमंत्रक पदाची जबाबदारी दिली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget