Breaking News

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत वाचन प्रेरणा दिन साजरा

सातारा (प्रतिनिधी) : जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा व श्री शिवछत्रपती वाचनालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनादिवशी वाचन प्रेरणा दिन दि. 15 ऑक्टोबर रोजी श्री शिवछत्रपती वाचनालय, सातारा येथे साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी वाचन या विषयावर प्रमोद जगनाथ कोपर्डे, ज्येष्ठ साहित्यिक यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील साहित्याचे तसेच पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर व राम गणेश गडकरी या ख्यातनाम साहित्यकांच्या साहित्याचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. वाचन प्रेरणा दिनाचा व ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ सभासद, वाचक, अभ्यासक व परिसरातील नागरिकांनी घेतला.