राष्ट्रवादी गटातटात दंग, भाजपा तयार येथे लावण्यार सुरंगशहरटाकळी /रविंद्र मडके -
निवडणुकीचा राजकीय रंग हळूहळू चढण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आता आपआपल्या नेतृत्वाच्या पुढील ध्येयधोरणाविषयी जाहीर मत प्रकट करत आहेत. असे असले तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र एकमेकांचे पाय ओढण्यात दंग असून याला सु’रंग’ लावण्यासाठी भाजपचे स्था निक कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्याकार्यर्त्यां मधील मतभेत आता उघडपणे पाहायला मिळत आहेत. स्थानिक निवडणुक ांत कार्यकर्त्यांमधील मतभेद दृढ झालेले असतात. याला पायबंद घालण्यास माजी आ.नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र सध्या तरी तसे होताना दिसत नाही. यामुळे नाराज मंडळींपैकी अनेकजण भाजपाला समर्थन करताना दिसत आहेत. येणारे दिवस हे जिल्हा परिषद द हिगाव ने गटासाठी संघर्षाचे ठरू नये असे वाटत असेल तर याला योग्य वेळी पायबंद घालणे गरजेचे आहे. हा भाग माजी आ. डॉ. नरेंद्र घुले आणि मा.आ. चंद्रशेखर घुले यांच्याशी एकनिष्ठ असणार्‍या कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र अनेक वर्षांपासून येथील राष्ट्र ्रवादीचेच कार्यकर्ते दोन गटात विभागलेले आहेत. स्थानिक कार्यकर्ते सर्वच गावांत दोन गटात विभागले गेलेले आहेत. ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी, पाणीवापरसस्थांच्या निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी हे एकमेकांशी प्राणपणाने लढत असतात. येणारे दिवस चांगले हवे असतील तर ही परिस्थिति आता बदलायला हवी. गटातटात विभागलेला प्रत्येक कार्यकर्ता एका धाग्यात गुंफला गेला पाहिजे. लोकनेते स्व. मारुतरावजी घुले पाटील यांनी आपल्या कार्यातून दिलेला संदेश आणि विचारांची शिदोरी अंमलात आणली तर गटतट दूर होऊ शकतील. मात्र तसे होताना दिसत नाही. गटतट यामध्ये विखुरलेला प्रत्येक कार्यकर्ता दिवसागणिक आणखी दुरावत चालला आहे. कानभरणी करणारे, वैयक्तिक स्वार्थासाठी पुढे पुढे करणार्र्‍यांचाच थवा नेत ृत्वाभोवती घोंगावताना दिसतो. जुना, प्रामाणिक, सच्चा कार्यकर्ता आज दुरावला जावून नेतृत्वाला भेटण्यासाठीही नेत्याच्या जवळच्या लोकांकडून त्याची उपेक्षा केली जाते. हे चित्र बदलून विधानसभेत तालुक्याला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी एकदिलाने लढण्यास पुढाकार घेऊन सुविचारांची माळ गुंफन्याची आज खर्‍या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. असे झाले तरच खर्‍या अर्थाने बालेकिल्ल्याला पूर्ववैभव मिळण्यास मदत होणार आहे.

एकनिष्ठ कार्यकर्ते दुरावले...
राष्ट्रवादीचे काही एकनिष्ठ कार्यकर्ते दुरावले गेले आहेत, त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये अनेक गावांत ते भाजपाच्या पक्षाशी एकनिष्ठ नसणार्‍या
कार्यकर्त्यांना सोबत घेतात. अशा कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेत आवर घालून पुढील ध्येयधोरणे ठरवण्याची गरज आहे. अन्यथा ही गावागावातील ‘फूल घड्याळ’ युती धोक्याची ठरू शकते. असे मत जानकर मडळीं व्यक्त करत आहे.


Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget