Breaking News

कराडात अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार


कराड, (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले. कॉटेज हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवार, दि. 4 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान संबंधित मुलीवर वार करणारा संशयित युवक गायब झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस त्याचा शोध घेत होते. 

येथील शिवाजी स्टेडियम परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यामध्ये तिच्या हातावर व गळ्यावर वार झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. संबंधित अल्पवयीन मुलगी जखमी अवस्थेत घरातून बाहेर पळत आल्याने हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. मुलीला उपचारासाठी नातेवाइकांनी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलविले.