वैरण बियाणे व खते वितरण योजना; राबविण्यासाठी इच्छुक पशुपालकांनी अर्ज करावे


बीड :-राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यातील संभाव्य चारा टंचाई तीव्रता कमी करण्याकरिता वैरण बियाणे व खते वितरण ही योजना राबविण्यासाठी दि.३० ऑक्टोंबर २०१८ ते १२ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती येथे अर्ज सादर करण्यात यावेत. या अर्जा सोबत सातबारा उतारा व सिंचन क्षेत्र असल्याबाबतचा पुरावा जसे की, विहीर, शेततळे, बोरवेल अथवा कालवा असल्याचा पुरावा जोडण्यात यावा. 

या योजनेमध्ये पशुपालकांना किमान १० आर क्षेत्रामध्ये मका आफ्रिकन टॉल किंवा ज्वारी ही वैरणीचे पिके घेण्यासाठी प्रती १० आर जमीनीसाठी रु ४६० अनुदान आहे. त्यामधुन प्रत्यकी ५ किलो मका बियाणे/ ४ किलो ज्वारीची बियाणे खरेदी करून देण्यात येणार आहे. उर्वरीत रक्कम खते व इतर बाबीसाठी संबंधित पशुपालकांच्या बँक खात्यावर डिबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना संबंधित पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून देण्यात असून इच्छुक पशुपालकांनी दि.३० ऑक्टोंबर २०१८ ते १२ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत आपल्या तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी(वि) पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बीड यांनी केले केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget