Breaking News

ब्युटी पार्लर व शिवणकला प्रशिक्षणाचे आयोजन


बीड, (प्रतिनिधी)- भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, बीड यांच्यावतीने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार महिला उमेदवारांसाठी १ डिसेंबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत ब्युटी पार्लर व शिवणकला ३० दिवसाचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रशिक्षनार्थ्या ची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येईल. प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत व निवासी आहे. प्रशिक्षणार्थ्यांच्या राहण्याची,३ वेळेस चहा, नाष्टा २ वेळा जेवणाची सोय संस्थेमार्फत मोफत करण्यात येणार आहे. 


प्रशिक्षणादरम्यान उमेदवाराला योग प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षणादरम्यान तज्ञ शिक्षक, यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षनार्थ्यास व्यवसाय सुरू करण्यासाठी २ वर्ष मार्गदर्शन व पाठपुराव करण्यात येईल. या प्रशिक्षणासाठी अटी व नियम याप्रमाणे आहेत. उमेदवार हा सुशिक्षित बेरोजगार आसावा, त्याचे शिक्षण सुरु नसावे, शैक्षणिक पात्रता किमान ८ वी पास आसावा. कुटुंबाचे दारिद्र रेषेखालील यादीमध्ये नाव असावे, उमेदवार ग्रामीण भागातील रहिवाशी असावा. उमेदवाराचे वय किमान १८ ते ४५ वर्षे असावे, प्रशिक्षनार्थ्यास व्यवसाय करण्याची आवड असावी. प्रशिक्षणासाठी कमाल ३५ उमेदवारांची उपस्थिती आवश्यक आहे. 

या प्रशिक्षणासाठी अर्ज सर्व विस्ताराधिकारी तालुका पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय, बीड व प्रशिक्षण संस्था, एस.पी. ऑफिससमोर, भारतीय स्टेट बँक, शिवाजीनगर शाखेच्या वर, बीड येथे मिळतील. पात्रता पूर्ण करणार्‍या उमेदवारांनी दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ पूर्वी अर्ज भरून प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा. याबाबतच्या अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र.०२४४२- २२० २८२ संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संचालक एम. पी. वाघमारे यांनी केले आहे.