पाटण-कराड मार्गावर वाहनचालकांची घुसमट


पाटण (प्रतिनिधीे) : पाटण-कराड मार्गावर ठिकठिकाणी जुना रस्ता उधवस्थ करूण पर्यायी रस्त्याची वाट लई बिकट त्यातच रुंदीकरणाचा धुरळा उडत आहे. वाहन चालकाच्या नाका-तोंडात जाऊन जिवाची घुसमट होऊ लागल्याने प्रवास जीवावर बेतू लागला आहे.

पाटण-कराडचा रस्ता प्रख्यात कंपनी बांधकाम करत आहे. तोही रटाळ पध्दतीने सुरू असून लहान पूल बांधण्यासाठी काढलेले मोठे खड्डे प्रवाशांची डोकेदुखी तर मनवीवस्ती शेजारी धोकादायक परिस्थिती झाली आहे. प्रशासनाने या कंत्राट कंपनीला सांगण्याची मागणी होत आहे.

सध्या पाटण-कराड रस्ता रुंदीकरण कामानिमित्त वृक्षतोड, पूल बांधणे, रुंदीकरण करणे, रस्त्याची वाहतूक इतरत्र मार्गाने वळवण्याची कामे सुरू असताना मोठे खड्डे खोदले आहेत. हे खड्डे मानवी वस्ती शेजारी धोकादायक व डोकेदुखी होत आहे. मॉंर्निंग वॉंक वेळी वयस्कर या खड्यात पडत आहेत. वाहनांची गर्दीने वादावादीचे प्रकार होत आहेत. यात विद्यार्थी, वृध्द रुग्ण, नोकरदार, महीला या प्रकारचे व प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून या मार्गावर धुरळा उडत आहे. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. झाडे तोडल्याने ती जागा भकास झाली आहे. रणरणत्या उन्हात प्रवासी, वाहनधारक हैराण झाले आहेत. प्रादेशिक विकासात सर्वांची साथ पाहिजे परंतू त्रास देऊन नव्हे. रस्ताकडेला शेतजमीनीतील जिवापाड जपलेली झाडे नेस्नाभुत केली आहेत. तसेच तोडलेली झाडे रस्ता लगत पडली आसल्याने धोकादायक प्रवास झाला आहे. तसेच एका तासाभराच्या प्रवासाला धुरळ्यामुळे दुप्पट वेळ लागत आहे. शेतकरी व स्थानिक रहिवासी तसेच प्रवाशांना जो आर्थिक, मनसिक व शारीरिक त्रास होत आहे. याबाबत कोणाला जाब विचारायचा अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget