घाटबोरी गावात विकास कामाला वेग सरपंच गजानन चेनेवार यांच्या कार्यकाळात अनेक कामे लागले मार्गी


घाटबोरी, (प्रतिनीधी): गट ग्राम पंचायत घाटबोरी अंतर्गत येत असलेले टेंभुरखेड घाटबोरी व नागेशवाडी या गावात सध्या ग्राम पंचायतच्या सौजन्याने विकास कामे जोरात सुरू आहेत. नवनिर्वाचीत सरपंच गजानन दादा चेनेवार यांना पदभार सांभाळुन अजुन नऊ महीने पुर्ण सुध्दा झाले नाहीत. त्यातच त्यांनी विकास कामाचा धडाका लावला आहे. यामध्ये प्रामुख्याने टेंभुरखेड येथील पाईपलाईनची विहीर खोदुन स्वःखर्चाने विद्युत पंपाचा खर्च करुन लोकांची पाण्याच्या पाण्याची गैरसोय दुर केली. त्यांनी ठक्कर बाप्पा योजनेतून टेंभुरखेड येथील आदिवासी वस्तीतील रस्ता काम पुर्ण केले. नागेशवाडी येथील सभामंडप व ठक्कर बाप्पा योजनेमधुन रस्त्याचे काम जलदगतीने पुर्ण केले. घाटबोरी येथील जि.प. शाळेच्या खोलीचे बांधकाम केले. ग्रामपंचायत भवनाचे नूतनीकरण केले. 

गेल्या कीत्तेक दिवसापासून घाटबोरीच्या बसस्थानकावर चिखल होत असे. या ठिकानी खडीकरण व वृक्षारोपन करुन त्यांचे संवर्धन केले. तसेच शिक्षक कॉलनी परिसरात पुर्ण रस्ता खडीकरण व झोपडपट्टी रस्ता व गावातील अनेक रस्त्याचे खडीकरण केले. आठवडी बाजारा जवळील पाईपलाईनचे विस्तारीकरण करून सर्वांना पाणी पुरविले. आता आठवड्यातुन दोनवेळा पाणीपुरवठा होत आहे. डॉ.शिवकांत डोंगरे यांच्या दवाखान्या जवळील गणपती मंदीरासमोर सभामंडपाचे काम जोरात चालू आहे. पाटील गल्लीतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण व घाटबोरी येथील टावरखांबावर 120 वॅटचे प्रतेकी 5 लाईट बसवुन घाटबोरी गावाला दिवाळीपुर्वी प्रकाशमय करुन टाकले आहे. सरपंच गजानन दादा चेनेवार यांची काम करण्याची जिद्द पाहुन सवत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget