Breaking News

महेश महिला मंडळाच्यावतीने जिल्हा रुग्णालयाला सहा नेबुलायझर मशिन


बीड, (प्रतिनिधी):- येथील महेश महिला मंडळाच्यावतीने जिल्हा रुग्णालयाला काल सहा नेबुलायझर (वाफेच्या) मशिन देण्यात आल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे महिला पदाधिकार्‍यांनी सदरील मशिन सुपूर्द केल्या. बीड येथील जिल्हा रुग्णालयात नेबुलायझर मशिन देवून महेश महिला मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. 

सहा मशिन शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी महेश महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री सोमानी, उपाध्यक्षा अनिता बाहेती, सचिव मंगल जेथलिया, प्रवर्तिका शशिकला राठी यांच्यासह सदस्या हेमा बाहेती, पुष्पा जेथलिया, शोभा जेथलिया, अरुणा लड्डा, अनिता करवा, मंजु मालू, सुवर्णा मालपाणी, प्रियंका बन्सांळी, रुपाली करवा, मंगल लोहिया, दिपाली जाजू, शारदा मुंदडा, रेखा सारडा, ज्योती सारडा, छाया सारडा, किरण सारडा, पुष्पा तोष्णीवाल, मंगल राठी, तारा सिकची, सुरेखा कासट, ललिता लद्दड, देवकन्या बंग, ज्योती तोष्णीवाल, सुमन तापडीया आदिंची उपस्थिती होती.