Breaking News

शिवस्मारकाचे काम सुरू करा - उच्च न्यायालय


मुंबई/प्रतिनिधी
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या कामास अंतरीम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हा प्रकल्प आवश्यक ती जनसुनावणी, पर्यावरणविषयक परवानग्याशिवाय राबवण्यात येत आहे. तसेच राज्यात दुष्काळासारख्या अनेक समस्या असताना 3 हजार 600 कोटी रुपये या स्मारकावर उधळण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे या प्रकल्पामुळे 16 हजार मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाच्या साधनावर दुष्परिणाम होणार आहेत इत्यादी आरोप कन्झव्र्हेशन अ‍ॅक्शन ग्रुप या संस्थेसह श्‍वेता वाघ आणि प्रा. मोहन भिडे यांनी स्वतंत्र याचिकांद्वारे केले होते.