Breaking News

बसस्थानक आवारातील तक्रारींचे निवारण त्वरीत करा


जामखेड ता./प्रतिनिधी 
 जामखेड बसस्थानक आवारातील तक्रारीचे निवारण लवकरात लवकर करणार असे आश्‍वासन नियंत्रक राष्ट्रीय परीवहन मंडळ अहमदनगर विजय गीते यांनी दिले एस. टि .महामंडळ आवारातील बर्‍याच तक्रारीचे निवेदन गेली तीन महिन्यांपूर्वी डेपो मॅनेजर शिरसाठ यांचे कडे दिले होते. परंतु त्या तक्रारींचे निवारण न झाल्याने आज दि. 31 रोजी विभागीय नियंत्रक रा. प. अहमदनगर यांचे कडे बसस्थानक मधील शौचालय खराब झाले असून नवीन बनवण्यात यावे तसेच आवारातील पार्किंग व्यवस्था व जुन्या एस.टी. बसस्थानक वर बस थांबा व मुलांना, प्रवाश्यांना बसण्याकरिता शेड करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोसले आणि संजय कोठारी यांनी केली यावेळी विजय गीते यांनी सर्वं संबंधित अधिकार्‍यांना बोलावून चौकशी करून केलेल्या तक्रारींचे लवकरच निवारण करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी मंडळाचे देवकर, शिरसाठ या वेळी सामाजिक कार्यकर्ते संजयजी कोठारी यांनी सांगितले बसस्थानक वर दीड वर्षात चार प्रवासी मयत अवस्थेत सापडले तेव्हा कर्मचार्‍यांनी मदत केली नाही. तेव्हा येथून पुढे रोज रात्री प्रवाश्यांची चौकशी करावी असे आदेश दिले. यावेळी अप्पा देवकाते, शेखर खेत्रे, विकास राऊत, बिराजदार पाटील, बाळासाहेब ढाळे आदी उपस्थित होते.