गुंड दत्ता जाधवला अटक


सातारा (प्रतिनिधी) : मोक्काअंतर्गत अटकेत असणर्‍या प्रतापसिंहनगरातील दत्ता जाधव व त्याच्या साथीदारांना शनिवारी सातारा शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. 

प्रतापपूर (ता. जत, जि. सांगली) येथे पोलीस दलावर हल्ला तसेच एका जमिनीच्या ताब्यावरून दाखल असणार्‍या गुन्ह्यात दत्ता जाधव व त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहेे. त्याच्याविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणी, अपहरण तसेच भुईंज पोलीस ठाण्यात भंगार व्यावसायिकास धमकावत खंडणी मागितल्याचे गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. दत्ता जाधवसह त्याच्या दोन साथीदारांना शनिवारी सायंकाळी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर तिघांना केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget