Breaking News

आनेवाडी टोलनाक्यावर सफारीची ट्रकला धडक


सातारा (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला सफारी गाडीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना उपचारासाठी सातारा जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मुंबई कर्नाटक राज्याकडे निघालेली सफारी गाडी येथील आनेवाडी टोलनाक्यावर आली असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रक जावून आदळल्याने झालेल्या अपघतातात अमीना कोका (वय 60) ही जागीच ठार झाली तर हमजा कोका (वय 36), शब्बीर कोका (वय 13), शहासन कोका (वय 38) हे जखमी झाले. जखमींना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अचानक झालेल्या या घटनेने एकाच घरातील तिघेजण जखमी झाले आहेत.