Breaking News

जनसंघर्ष यात्रा व जाहिर सभेस लोटला जनसागर भाजपचा चौकीदारच चोर निघाला -खा.मल्लिकार्जुन खर्गे


अंबाजोगाई (प्रतिनिधी) ज्या भाजपने आपणास चौकीदार म्हणून निवडून द्या असे जनतेला आवाहन केले. निवडून आल्यानंतर मात्र देशाच्या तिजोरीची प्रचंड लुट केली, अन्यायकारक कायदे काढले डिझेल, पेट्रोलची दरवाढ केली, राफेल विमान खरेदीत घोटाळा केला.बँका लुटणार्या निरव मोदी, विजय मल्या,मेहता, चोकसी यांना देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली.रातोरात सीबीआयचे संचालक बदलले,प्रसार माध्यमांवर बंधने आणली. देशावर सामाजिक गुलामगिरी लादली अशा भ्रष्ट चौकीदारापासून देशास धोका निर्माण झाला आहे कारण,भाजपचा चौकीदारच आज चोर निघाला आहे.देशाचे, संविधानाचे रक्षण करण्यासाठी भारतात धर्मनिरपेक्षता,सौहार्द टिकवण्यासाठी २०१९ ला कॉंग्रेसला मत देवून भाजपला नेस्तानाबूत करा असे आवाहन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते व महाराष्ट्राचे प्रभारी खा.मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.तर यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी यावेळी सांगितले की,शासनाच्या विरोधात महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. या यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत आहे.ऐन दुष्काळात सरकार खोटे जिआर काढून व आश्‍वासने देवून जनतेचे दिशाभूल करीत आहे. मोबाईलच्या लाईटखाली मंत्री दुष्काळाची पाहणी करीत आहेत.कारण, महाराष्ट्रच अंधकारात बुडाला आहे.त्यामुळे असे भ्रष्ट नाकरते सरकार सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी कॉंग्रेसला ताकद द्या असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकरावजी चव्हाण यांनी केले. जनसंघर्ष यात्रा आज गुरूवार,दि.१ नोव्हेंबर २०१८ रोजी अंबाजोगाईत आली या यात्रेचे जाहिर सभेत रुपांतर झाले.सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी खा.मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा. अशोकरावजी चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री प्रा.सुरेशराव नवले,प्रा.सत्संग मुंडे, प्रा.टि.पी.मुंडे,माजी आ.सिराज देशमुख, माजी आ.नारायणराव मुंडे,बीड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, मिनाक्षीताई पांडुळे, दादासाहेब मुंडे, नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी,नगराध्यक्ष आदित्य पाटील, प्रा.सर्जेराव काळे, डॉ.अंजलीताई घाडगे, राजेसाहेब देशमुख, बाबुराव मुंडे,संजय दौंड,ऍड.माधव जाधव, अजित चव्हाण, प्रा.विजय मुंडे, ऍड.अनंतराव जगतकर,एम.ए.हकीम, ऍड.विष्णुपंत सोळंके, असिफोद्दीन खतीब आदींसह पक्षाचे राज्य व जिल्हा पातळीवरील नेते यांची प्रमुख उपस्थित लाभली. यावेळी बीड जिल्ह्यातून पक्षाचे विविध नेते, पदाधिकारी,तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते