विरोधी पक्षनेत्यांचे दुष्काळातही खोटारडे राजकारण


बीड, (प्रतिनिधी)- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे हया दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी सर्वाच्या अगोदर बांधावर पोहोचल्या त्यावेळी विरोधी पक्षनेते कुठे होते? असा सवाल करून जिल्हा भाजपने धनंजय मुंडे हे दुष्काळावरून खोटारडे राजकारण करत असल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व राज्य सरकारवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दुष्काळाग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांना तब्बल एक महिन्यानंतर आता कुठे वेळ मिळाला आहे. शेतक-यांसोबत असलेली त्यांची दिवाळी नाटकी आहे. शेतक-यां बद्दल त्यांना खरचं सहानुभूती असती तर इतके दिवस त्यांनी कशाची वाट पाहिली? यामागे त्यांचे केवळ खोटारडे राजकारण असल्याचे भाजपने म्हटले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget