Breaking News

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना


बीड, (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य अंतर्गत राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या आसमान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्वांगीण विकासा साठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. सन २०१८-१९ पासून प्रतिष्ठान कडून आसमान निधी योजना सुधारित करण्यात आली आहे. या असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार सन २०१८ १९ साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना, नियम व अटी प्रतिष्ठानच्या ुुु.ीीीश्रष.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्ज संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावा. असे आवाहन सुभाष राठोड, ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांनी
केले आहे. सन २०१८ १९आसमान निधी योजनेच्या लाभासाठी ग्रंथालय सेवा देणार्‍या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य करण्यात येते. राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे ५०/ ६०/ ७५/ १२५/ १५० वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य.