Breaking News

बस गोठ्यात घुसून पाच जण जखमी


गडचिरोली (प्रतिनिधी)- गडचिरोली जिल्ह्यात अहेरी आगारातील अहेरी-नागपूर बसला गुरूवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. एका सायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस थेट गोठ्यात घुसली. या अपघातात बस चालक शंकर नागोसे, सायकलस्वार फुलीया राठोड यांच्यासह आणखी तीन प्रवासी जखमी झाले आहेत. 

आलापल्ली-बोरीमार्गावरील लभानतांडा -फुलसिंगनगर गावात हा अपघात झाला. या अपघातात बस चालकासह चार प्रवासी आणि एक सायकलस्वार जखमी झाले आहेत. जखमींना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अपघाताच्या वेळी गोठ्यात गुरे बांधलेली नव्हती. त्यामुळे प्राणीहानी झाली नाही; मात्र गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.