‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ ग्रंथ जिल्हा माहिती कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध


सातारा (प्रतिनिधी) : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत महाराष्ट्र आणि महात्मा गांधी या शीर्षकाचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. या ग्रंथात महाराष्ट्र आणि गांधीजींच्या वैशिष्ट्यपूर्ण संबंधांचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे.

या ग्रंथासाठी महाराष्ट्रातील गांधी विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक, चिंतक, लेख अशा मान्यवरांनी लेखन केले आहे. गांधीजींची विचारधारा आजसुध्दा देशाच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक विकास व प्रगतीसाठी कशी गरजेची आहे हे समजून घेण्यासाठी या ग्रंथाचा नव्या पिढीला सुध्दा मोठा उपयोग होईल. या ग्रंथाच्या रुपाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महात्मा गांधीजींना त्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली आहे. हा ग्रंथ जिल्हा माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, एसटी स्टॅण्ड शेजारी, सातारा येथे उपलब्ध असून या ग्रंथाची किंमत फक्त 200 रुपये आहे. तरी नागरिकांनी जास्तीत-जास्त ग्रंथ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले आहे. महात्मा गांधी आणि महाराष्ट्र या ग्रंथाबरोबरच नव्याने महा मानव हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असून 10 पुस्तकांच्या खरेदीवर 25 टक्के इतकी सवलत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget