Breaking News

किनगावराजा येथे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा सत्कार


किनगाव राजा,(प्रतिनिधी): राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा किनगावराजात येथील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जानकर हे लोणार येथे कार्यक्रमानिमित्त आले होते.

यावेळी सिंदखेडराजा येथे जाताना जानकर किनगावराजात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव थांबले असताना भाजप व्यापारी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सुभाष घिके, डॉक्टर सेलचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, डॉ. अरविंद जाधव, डॉ. पिसे, सरपंच प्रतिभा पडुळकर, महिला भाजप जिल्हा सरचिटणीस सुनीता राजोते दीपक पडुळकर, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष दीपक घुगे, उपाध्यक्ष प्रदीप घिके, आश्‍विन सानप, प्रसाद कुलकर्णी, मनजीत देशमुख, नंदू मांटे, समाधान काकड आदी कार्यकर्त्यांनी यावेळी ना. जानकर यांचे पुष्पहाराने स्वागत केले. स्वागताला उत्तर देताना ना. जानकर यांनी तळागाळातील व्यक्तीला मंत्रिपदाचा माध्यमातून सहकार्य करण्याचे भाग्य मला लाभले आहे म्हणून यापुढेही तळागाळातील जनतेच्या समस्येकरिता सदैव कार्य करत राहण्याची ग्वाही दिली.