काँग्रेस-राष्ट्रवादी जागा वाटप


नगर/प्रतिनिधी.
अहमदनगर महापलिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपाची प्रत्यक्ष चर्चा करण्याच्या उद्देशाने आणि आघाडीचा निर्णय निश्‍चित करण्यासाठी येत्या 14 नोव्हेंबर रोजी मुंबईत पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची बैठक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी आयोजित केली आहे. या बैठकीची माहिती प्रदेश सरचिटणीस व निरीक्षक शामराव उमाळकर यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांना दिला आहे.


मनपा निवडणुकीसाठभ येत्या 13 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे.पक्षाकडे उमेदवारी मागणार्‍या इच्छुकांनी कागदपत्रांनी सर्व पुर्तत करून उमेदवारी अर्ज दाखल करावे व अशी माहिती पक्षाला द्यावी असेही उमाळकर यांनी सांगितल्याचे शहर ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी माहिती दिली. पक्षाने आघाडीचा निर्णयासाठी पंडीत नेहरू जयंतीचा मुहुर्त साधुन आयोजित केलेल्या या बैठकीला विरोधी पक्षनपेते ना.राधाकृष्ण विखे ,बाळासाहेब थोरात ,उमाळकर, सत्यजित तांबे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी दीप चव्हाण आदींनी निमंत्रित करण्यात आले आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होण्याचे घाटत होते मात्र आजपर्यंत त्याची चर्चा प्रत्यक्ष झाली नाही त्यामुळे उलट-सुलट बातम्यांना वाव मिहाला मात्र आता प्रत्यक्ष जागा वाटपाच्या चर्चेला सुरूवात आणि निर्णयही त्वरीत होण्याची शक्यता आहे अशी पृष्टी पत्रकात देण्यात आली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget