रन फॉर युनिटीला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद


अहमदनगर - राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या एकता दौडला (रन फॉर युनिटी) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा क्रीडा संकुलाच्या (वाडिया पार्क)मुख्य प्रवेशद्वारापासून सुरु झालेल्या या दौडला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रारंभ केला.तत्पूर्वी, त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. सकाळी 8 वाजता निघालेल्या या एकता दौडच्या प्रारंभावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपविभागीय अधिकारी उज्ज्लला गाडेकर, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, कबड्डीपटू अंजली वल्लाकट्टी, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवण्यासाठी सरदार पटेल यांनी मोलाची भूमिका बजावली.संस्थानांच्या विलीनीकरणात त्यांच्या कणखरपणाचा मोठा वाटा होता. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त या दौडचे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल येथून प्रारंभ प्रारंभ झाल्यानंतर टिळकरोड मार्गे आयुर्वेद कॉलेज चौक, रुपीबाई बोरा हायस्कूल, जुनी महापालिका इमारत, सबजेल चौक, झारेकर गल्ली, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट,सिद्धीबागमार्गे पोलीस मुख्यालय मैदान येथे ही एकता दौड पोहोचली आणि तेथे या एकता दौडचा समारोप झाला.

शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने या एकता दौडमध्ये सहभागी झाले होते. विविध शाळांतील विद्यार्थी या दौडमध्ये सहभागी होऊन त्यांनी राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करणारे फलक हाती धरले होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget