चैतन्य उद्योग समुहातर्फे दिवाळीनिमित्त बोनस व मिठाई

राहुरी/प्रतिनिधी
दिवाळी सणाचे औचित्य साधुन चैतन्य मिल्क, चैतन्य अ‍ॅक्वा व कानिफनाथ अर्बन मल्टीपर्पज निधि लि. या तीनही संस्थेत काम करणार्‍या अधिकारी व कर्मचारी वर्गास चैतन्य मिल्कच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास चैतन्य मिल्कचे चेअरमन गणेश भांड, अँक्वाचे अध्यक्ष संदिप भांड, एस.पी कार्यालयाचे सी. आय. डी. विभागाचे खंडागळे, व्यवस्थापक कैलास सांगळे, सोमनाथ खांदे, भारत भांड, निलेश कराळे, बाळासाहेब सांगळे, रफ़ीक शेख, गीताराम शेटे, विजय भोसले, संतोष जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गणेश भांड म्हणाले की, ज्या संस्थेत आपण काम करतो, ज्या संस्थेवर आपला प्रपंच अवलंबून आहे. त्या संस्थेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. संस्थेविषयी प्रेम , जिव्हाळा व आपूलकी असली पाहिजे. ही भावना कामगारांच्या मनात निर्माण जेव्हा निर्माण तेव्हा त्या संस्थेचा उत्कर्ष झाल्या शिवाय राहत नाही. सध्या दुध व्यवसाय अडचणीत आहे. परंतू कामगारांची दिवाळी आनंदात झाली पाहिजे हे महत्वाचे आहे. म्हणून संस्थेच्या वतीने कामगारांना बोनस व मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात संस्थेचे कर्मचारी अर्चना सोनवणे, मिरा शिंदे, अलम शेख, चोळके, दत्तात्रय करपे, नवनाथ शिंदे, मच्छिंद्र महाडीक, अविनाश कुंदे, गोरख खांदे, संकेत उंडे, अजिज शेख, गणेश भालेकर, शशीकांत गाडे, पाराजी डव्हाण, सलिम शेख, तबा वाबळे, प्रशांत लहारे, स्वाती गाडे, रेखा कोबरणे आदी कर्मचार्‍यांना उपस्थितांच्या हस्ते बोनस व मिठाई वाटप करण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget