शिवसेनेचे भाजपवर लपून प्रेम; युती होणारः मुख्यमंत्री


नागपूर (प्रतिनिधी)ः शिवसेना दररोज भाजपवर टीका करीत असताना भाजपला मात्र शिवसेनेबरोबर अजूनही युती होण्याची शक्यता आहे. शिवसेना ज्याप्रकारे भाजपला प्रत्येक मुद्द्यावर विरोध करून धारेवर धरत आहे, त्यावरून शिवसेना आगामी काळात भाजपबरोबर नसेल, असा अंदाज लावला जात असला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसे वाटत नाही. शिवसेनेचेही आपल्यावर प्रेम असून युती करायचीच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

शिवसेनेबरोबर युती आणि संबंध याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की भाजपचे शिवसेनेवर एकतर्फी प्रेम आहे, असा नेहमी आरोप होतो; पण ते खरे नाही. शिवसेनेचेही भाजपवर तेवढेच प्रेम आहे. फक्त आम्ही प्रेम जाहीरपणे व्यक्त करतो, तर ते आमच्यावर लपून प्रेम करतात, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

युतीबाबत काय म्हणाले फडणवीस..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आगामी काळाजीत भाजप-शिवसेनेच्या युतीबाबतही सुतोवाच केले. मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हाला युती करायचीच आहे. दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरून सर्व काही स्पष्ट झाले आहे. आमची युती होणारच, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केली. 


Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget