नेवासा पोलिसांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय एकता दौडला प्रतिसाद


नेवासा/प्रतिनिधी
नेवासा पोलीस स्टेशनच्यावतीने राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दौडमध्ये ज्ञानोदय इंग्लिश स्कूल व सुंदरबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, नंदकुमार पाटील, भाऊसाहेब घुले, बाळासाहेब पवार, गफूरभाई बागवान, भिवाजीराव आघाव, अंबादास ईरले, पंडितराव खाटीक, रंजनाताई देशमुख, जालिंदर गवळी, बाळासाहेब घुगरकर, विठ्ठलराव गायकवाड, बाळासाहेब नागरगोजे, इस्माईलभाई जहागीरदार, पत्रकार सुधीर चव्हाण यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे पंडितराव खाटीक यांनी स्वागत केले. पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुभेच्छा देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती व स्वर्गीय इंदिराजी गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले. यावेळी बोलतांना पोलीस निरीक्षक रणजीत डेरे म्हणाले की राष्ट्रीय एकता कायम रहावी बंधुभाव देशात नांदावा म्हणून पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याचे सांगून राष्ट्रीय एकता दौड च्या निमित्ताने राष्ट्रीय एकता व अखंडता मजबूत करा असे आवाहन केले. सुनील धस यांनी सूत्रसंचालन केले तर रंजनाताई देशमुख यांनी आभार मानले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकता दौडला प्रारंभ करण्यात आला राष्ट्रीय एकता दौड मध्ये पोलीस, शिक्षक विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget