हवेचा अंदाज घेऊन राजकीय निर्णयः आठवले


मुंबई (प्रतिनिधी)ः मी 10 ते 15 वर्षे काँग्रेससोबत होतो. आता भाजपसोबतही मला तितकाच किंबहुना त्याहून अधिक काळ राहावे लागेल. जोवर सरकार आहे, तोवर मी इथेच आहे. नंतर मी हवेचा अंदाज घेऊनच निर्णय घेणार, असे सूचक विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यामुळे सध्या भाजला साथ देणारे आठवले हे आगामी काळात भाजपची साथ सोडणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

आठवले हे शुक्रवारी मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात काँग्रेस आमदार नसीम खानही उपस्थित होते. भाषणादरम्यान खान यांनी आठवले यांना काँग्रेससोबत येण्याचे आवाहन केले. त्यावर आठवले म्हणाले, की मी 10 ते 15 वर्षे काँग्रेससोबत होतो. आता मी भाजपसोबत असून त्यांच्यासोबतही मला तितकाच काळ राहावे लागेल. जोवर सरकार आहे, तोवर मी इथेच आहे. मी हवा पाहून अंदाज ठरवत असतो. त्यामुळे मी हवा कोणत्या दिशेने जातेय, याचा अंदाज घेऊनच पुढील निर्णय घेईन, असे त्यांनी सांगितले. 
मला खूप दिवसांनी मंत्रिपद मिळाले आहे. अर्थात मी मंत्री आहे, म्हणून मला जनतेचा पाठिंबा आहे, अशी परिस्थिती नाही. मी मंत्रिपदावर नसलो, तरी जनता माझ्या पाठिशी उभी राहील, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget