Breaking News

कासवाची शिकार करणार्‍या आठ जणांना पकडले


खामगाव,(प्रतिनिधी): तालुक्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात कासवाची शिकार व मासेमारी करणार्‍या आठ जणांना वन विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. या आठही जणांविरुद्ध वन विभागाच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभयारण्यात मासेमारी करणार्‍यांविरुद्ध झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. गेरु माटरगाव ता. खामगाव हा परिसर ज्ञानगंगा अभयारण्यात येते. 

या अभयारण्यातील तलावात शेख जमिल शेख जुम्मा, रब्बानीखाँ इस्माईलखाँ, शेख जमीर शेख अमीर, अलीम चौधरी सलीम चौधरी, लतीफ शाह इस्माईल शाह, इक्बाल चाँद गवळी, आबीद खान जियाउल्ला खान, शेख सलीम शेख कासम रा. खामगाव व लाखनवाडा आदी आठ जण मासेमारी करताना वन विभागाच्या अधिकार्‍यांना मिळून आले. त्यांच्याकडून एक कासव, मासे व चार मोटार सायकली असा एक लाखाच्या वर मुद्देमाल जप्त केला. अधिक चौकशी केली असता या आठ जणांनी कासवाची शिकारी केल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई डीएफओ खैरीनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एस. डांगे, ए. विनकर, एस. तायडे, बी. महारवर, एस. निकावत, धुमाळे यांनी केली.