Breaking News

लकी ड्रॉ योजनेतून शाळा स्मार्ट करण्याचा निर्धार


लिमगाव (प्रतिनिधी) : वडवणी तालुक्यातील खळवट लिमगावच्या शाळेलने लकी ड्रा योजना राबवून शाळा स्मार्ट करण्याचा निर्धार केला आहे. शाळेच्या विकासासाठी लोकसहभा करण्यासाठी एक नामी शक्कल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खळवट लिमगावच्या शिक्षकांनी लढवली. खळवट लिमगावच्या शिक्षकांनी सर्व सोयीसुविधा आपल्या गावातच उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला .त्यांनी शाळा विकासासाठी निधी गोळा करुन करण्यासाठी चक्क लक्की ड्रॉं ची योजना यशस्वी राबवली. 

या योजनेचे पहिले बक्षीस मोटार सायकल, दुसरे बक्षीस फ्रीज ,तिसरे बक्षीस पिठाची चक्की,चौथे बक्षीस कपाट,पाचवे बक्षीस शिलाई मशीन, व प्रोत्साहपर बक्षीसात वस्तू वाटून गावात दिवाळी पुर्वीच दिवाळी साजरी केली.या सर्व लक्की ड्रॉं योजनेत तीन लाख रुपये जमा झाले यातून दिड लाखाची बक्षिसे वाटण्यात आली. जवळपास दिड लाख रूपये लोखसहभाग जमा झाले. या लोक सहभागातून आता शाळा स्मार्ट करण्याचा ध्यास शिक्षक बांधवानी घेतला आहे. या कार्यक्रमाच्चा अध्यक्ष म्हणून वडवणी तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी श्रीमती पटेल मँडम उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्री उजगरे साहेब,खळवट लिमगावचे सरपंच श्री भारत निसर्गध , उपसरपंच वसंत घाटूळ , शाळेचे मुख्याध्यापक बहिवार, दिपक आंबुरे , धनंजय माने यांच्या उपस्थित मध्ये झाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.बद्रीनारायण बादाडे सरांनी केले.तर आभार धाईतिडक यांनी मानले. मिरासे सर ,नानजकर सर, गायकवाड सर , आडे सर , कुटे सर, वाघमारे सर यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी यशीस्तेसाठी शाळा व्यवस्थापन समितीच,े र्व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले.