ठाणे कारागृहात कैद्यांनी बनविलेल्या सुबक वस्तूंच्या विक्री प्रदर्शनाचे उदघाटन कैद्याच्या हस्ते


ठाणे : प्रतिनिधी

कुठलाही माणूस हा जन्मतः गुन्हेगार प्रवृत्तीचा नसतो. कधी कधी परिस्थिती तर कधी समाजातील काही अपप्रवृत्ती या गुन्हेगाराला जन्माला घालतात. गुन्हा केला म्हणून सर्वच दोषी हे गुन्हेगार असतात असे नाही. जे दोषी ठरतात आणि त्यांना शिक्षाही होते. पण त्यांच्या वर्तवणुकीवरून ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नसल्याचे सिद्ध होते. अशाच जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक जेष्टनागरिक असलेला खंडू गोविंद नाईकवडे याच्या हस्ते शुक्रवारी ठाणे कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कलाकार आणि कौशल्य असलेल्या हातानी बनविलेल्या विविध गृहपयोगी वस्तूंचे निर्माण दिवाळीसाठी केले. त्या वास्तूच्या प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवारी खंडू नाईकवाडे या कैद्याच्या हस्ते करण्यात आले. ठाणे कारागृहाचे अधीक्षक एन बी वायचळ यांनी एक नवी संकल्पना आणि नवा पायंडा घातल्याचे चित्र या प्रदर्शनाच्या उदघाटनावरून दिसत आहे. 

ठाणेकरांना दिवाळीत मेवा ,गृहपयोगी वस्तू ,सागवानी खुर्च्या, चौरंग, देव्हारा,विविधप्रकरच्या खुर्च्या स्टँड, शोपीसच्या वस्तू टॉवेल शर्ट लेडीज पर्स , बेकरी उत्पादने बिस्किटे अशा विविध वस्तू कारागृहातील कैद्यांनी तयार केल्या आहेत. या गृहपयोगी वस्तू आता सर्वसामान्य नागरिकांना विक्री करण्यात येणार आहेत . कारागृहात शिक्षा ठोठावलेल्या आणि बंदिस्त असलेले कैदी काम करत नाहीत. असा समाज अनेकांचा आहे. परंतु ठाणे कारागृहात शिक्षाधीन बंदी असलेल्या कैद्यांनी कारागृहात अनेक गृहपोयोगी वस्तूंच्या निर्मितीचा उदयोग गेल्या अनेक वर्षांपासून सुरु केला आहे. यात शोपीस वस्तू, कपडे, बेकरी उत्पादन, फर्निचर वस्तू, गृहपयोगी व शोभेच्या वस्तू तयार केल्या आहेत. या वस्तूंची विक्री बाजारात व्हावी यासाठी ठाणे कारागृह प्रशासनाने एक वस्तूंचे प्रदर्शन आणि वस्तूची विक्री करण्यासाठी उपलब्ध केल्या आहेत.


कारागृहात शिक्षा भोगणारा कैदी हे देखील माणूस असून त्याला त्याचे हातून घडलेल्या गुन्हयाचा कालांतराने पश्चाताप असतो तो समाजाचा एक घटक असून त्याने भविष्यात कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदर्निर्वाहासाठी काहीतरी कौशल्य असावे या हेतूने व कारागृहाचे ध्येय सुधारणा व पुर्नवसन या दृष्टीकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते तसेच कारागृहात शिक्षा भोगत असताना कैद्यांचे कौशल्य समाजापुढे यावे या उद्देशाने कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तू विक्री केंद्राचे उद्धघाटन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वस्तूचे उदघाटन जन्मठेप शिक्षा भोगणाऱ्या, आणि परिवर्तनाची लढाई यशस्वी जिंकलेल्या चांगल्या वर्तुणीकीचा कैदी खंडू गोविंद नाईकवडे याच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले आहे. यामुळे ठाणे कारागृह अधीक्षक यांच्या संकल्पनेतून कैद्यांच्या वस्तू निर्मिती प्रदर्शनाचे उदघाटन जेष्ठ आणि चांगल्या वर्तवणुकीच्या कैद्याच्या हस्ते करण्यात आले. हा महाराष्ट्रात असलेल्या कारागृहांमधून पहिल्यांदाच राबवण्यात आलेला उपक्रम आहे. या आगळ्या वेगळ्या उद्घटनाप्रसंगी कारागृहाचे अधीक्षक एन बी वायचळ, वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget