भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवाही करा नसता आत्मदहन करणार -तांबे


बीड (प्रतिनिधी) तालुक्यातील तांबा राजुरी ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवकाने मिळून चौदाव्या वित्त आयोगामध्ये मोठा भ्रष्टाचार करून निधीची वाट लावली आहे. गावात काही कामे बोगस तर काही कामे अवर्धट करून तशीच पडून आहेत. भ्रष्ट सरपंच आणि ग्रामसेवकामुळे गावचा विकास खुंटला असून भ्रष्टाचाराची चौकशी करावी नसता आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते नितीन मधुकर तांबे यांनी दिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड तालुक्यातील तांबा राजुरी ग्रामपंचायतने प्रशासनाची फसवणूक केली आहे. 

प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने सरपंच आणि ग्रामसेवकाचा मानमानी कारभार सुरू आहे. गावातील रस्ते, पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज या मुलभूत प्रश्नाकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आहे. ग्रामस्थांकडून विविध कर स्वरुपात आकारलेल्या पैशांतून विकास करण्याऐवजी स्वत:चे हित साध्याचे काम सरपंच, ग्रामसेवकाने केले आहे. शाळा खोल्यांची तात्पुरती डागडुजी करून मोठा निधी लाटला आहे. गावात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. काही योजनांच्या अर्धवट मदुरुस्त केल्या आहेत. अर्थात याला ग्रामसेवकाचाही पाठिंबा आहे. नियामनुसार पाच ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना एकही ग्रामसभा तांबा राजुरी ग्रामपंचायतने घेतली नाही. ग्रामसभा घेण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर २३ ऑगस्टला एक ग्रामसभा प्रत्यक्षात घेतली. या सभेत अद्याप दहा लाख रुपये खर्च झाल्याचे केवळ तोंडी सांगण्यात सरपंचांनी धन्यता मानली. सर्व जमा खर्चाचा तपशील सप्टेंबरमध्ये होणार्या ग्रामसभेत देऊ असे आश्‍वासन सरपंच दीपक तांबे यांनी दिले. मात्र अद्यापही ते आश्‍वासन पूर्ण झाले नाही. ग्रामसभा कागदोपत्री घेण्यात आल्या. ग्रामपंचायतमध्ये झालेल्या सर्व कामांची माहिती दि.२.८.२०१८ तसेच २९.८.२०१८ रोजी माहिती अधिकारांतर्गत मागितली असता ती देण्यात आली नाही. या प्रकरणी केवळ चालढकल करण्याचे काम सरपंच व ग्रामसेवक करत आहेत. चौदाव्या वित्त आयोगातून ३१ जुलै २०१८ पर्यंत मिळालेला २४ लाख ४९ हजार ७२५ रुपयांच्या निधीतून गावात परिवर्तन करणे गरजेचे असताना सर्व निधी केवळ कागदोपत्री खर्च झाला आहे. सहा महिन्यांत सरपंच आणि ग्रामसेवकाने शांत डोक्याने जवळपास १७ लाख ३ हजार ५९१ रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे सादर केले आहेत. तांबा राजुरी येथील ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण तांबे, सौ.तांबे, नितीन तांबे व ग्रामस्थांनी केली आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget