Breaking News

श्रद्धेला शेवटच्या श्‍वासापर्यंत जपा-भास्करगिरी महाराज


नेवासा/प्रतिनिधी
नेवासा येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिराचे निर्माते हभप वैकुंठवाशी बन्सी महाराज तांबे यांच्या 24 व्या पुण्यतिथी आयोजित ग्रंथराज श्री ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. संत व भगवंताबद्दल असलेल्या श्रद्धेला शेवटच्या श्‍वासापर्यंत जपा, श्रद्धेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले. 

संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिराचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या पारायण सोहळ्याची सांगता गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते वैकुंठवाशी गुरुवर्य बन्सीबाबांच्या प्रतिमा पूजनाने व काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. यावेळी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की गुरुवर्य बन्सी बाबांनी परमार्थाची वाट भक्तांना दाखविली, माऊलीच्या पैस खांबासाठी मंदिर निर्माण करून ज्ञानेश्‍वरी रचनास्थानाचे व नेवासे नगरीचे वैभव त्यांनी वाढविले. संत व भगवंताबद्दल असलेल्या श्रद्धेला शेवटच्या श्‍वासापर्यंत जपा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात त्यांनी भगवान परमात्म्याच्या बाललीलांचे वर्णन केले. यावेळी संस्थानचे माधवराव दरंदले यांनी उपस्थितांचे स्वागत केले सोहळ्यात योगदान देणार्‍यांचा यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन गौरव करण्यात आला. माऊली सेवेकरी भाऊसाहेब माळवे यांनी हस्तलिखित केलेल्या ज्ञानेश्‍वरीच्या 

पोथीचे प्रकाशन 


गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हभप पंढरीनाथ महाराज तांदळे, हभप बाळू महाराज कानडे, कृष्णा महाराज पिसोटे, कैलास जाधव, हभप ज्ञानेश्‍वर शिंदे, जालिंधर गवळी, प्रकाश महाराज, भानुदास महाराज गायके, देविदास साळुंके, भिकाजी जंगले, गोविंदराव शेटे, अशोक शिंदे, राजाराम महाराज, अंजाबापू कर्डीले, मृदुंगाचार्य गणेश महाराज गायकवाड, भास्करराव तारडे, ज्ञानेश्‍वर पवार, विणेकरी प्रल्हाद महाराज चव्हाण, भगवान सोनवणे, संजय सुकाळकर, गोटूभाऊ तारडे, गोरख भराट यांच्या सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. उपस्थित वारकर्‍यांचे व भक्तगणांचे हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी आभार मानले.