संभाजी ब्रिगेडचा बीड जिल्ह्यात झंजावात


बीड, (प्रतिनिधी) ः संभाजी ब्रिगेडचा बीड जिल्ह्यात झंजावात सुरूच असून दिवसेंदिवस ब्रिगेडच्या शाखेत भर पडत आहे. युवक मोठ्या संख्येने संभाजी ब्रिगेड मध्ये दाखल होत आहे. शुक्रवारी दि. ९ नोव्हेंबर रोजी आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे शेकडो युवकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संभाजी ब्रिगेडच्या शाखेची स्थापना करण्यात आली. 

जिल्हाध्यक्ष ऍड.राहुल वायकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख योगेश नरवडे, रंजित दुबाले,संभाजी ब्रिगेड आष्टी तालुकाध्यक्ष प्रा भागचंद झांजे , भारतीय मराठा महासंघ आष्टी तालुकाअध्यक्ष संभाजी भोगाडे,संभाजी ब्रिगेड आष्टी तालुका ऊपाध्यक्ष आविनाश जगताप, संभाजी ब्रिगेड आष्टी तालुका कार्यआध्यक्ष युवराज देवकर ,शिरापूर गावचे सरपंच बिभीषण कवडे, उद्योजक आशोक चौधरी, प्रमोद चौधरी, संतोष पडोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मागील काही महिन्यांपासून जिल्हाध्यक्ष ऍड राहुल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेड झपाट्याने वाढत असून ब्रिगेडमध्ये दाखल होणार्या युवकांच्या संख्येत भर पडत आहे. आष्टी तालुक्यातील शिरापूर (प्रतिनिधी). ९ नोव्हेंबर रोजी शेकडो युवक एकत्र येऊन संभाजी ब्रिगेडच्या शाखेची स्थापना केली. यावेळी संभाजी दातीर, सुनिल जिवे, हारिशचंद्र जगताप, बाबासाहेब देवकर, मयुर गव्हाणे, गौरव वामन, संतोष देसाई, भिमराव देवकर, सचिन देवकर, आशोेक देवकर, सागर जगताप, तुषार लोरूडे, शुजांत गिलचे, महेश जगताप, आदींची ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ऍड राहुल वायकर म्हणाले की, संभाजी ब्रिगेड तरूणांना घडविण्याचे काम करत असून संभाजी ब्रिगेडच्या माध्यामातून आतापर्यंत यशस्वी उद्योजक घडलेले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश करणार्या तरूणांची संख्या वाढत आहे. तरूणांना सोबत घेवून आपण सर्व आन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणार आहोत. यासाठी आपण सर्वांनी सज्ज रहावे असे आवाहन ऍड.राहुल वायकर यांनी केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget