भूमी अभिलेख कार्यालयात सर्वसामान्यांची अडवणूक


फलटण (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य नागरीक व शेतकर्‍यांची अडवणूक करत आहेत. त्यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला नागरीक त्रस्त झाले आहेत. अधिकार्‍यांनी कामकामात सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला आहे. कामकाजात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत शिवसेनेचे माजी फलटण तालुका उपप्रमुख प्रदीप झणझणे यांनी भूमी अभिलेखच्या तालुका उपअधीक्षक शिल्पा जवक यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख फलटण येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने या कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. मोजणीचे शुल्क भरूनही मोजणीची कामे ठरलेल्या वेळेत केली जात नाहीत. नकाशे, अभिलेख कागदपत्र देण्यासाठी शेतकर्‍यांची अडवणूक केली जाते. मोजणी झाल्यानंतर देण्यात येणार्‍या क प्रत नकाशासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. विनाकारण मोजणी कामात त्रुटी काढून नागरिकांना नाहक त्रास कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी देत आहेत. मोजणीसाठी लागणारी कागदपत्रांची नक्कल मागणी अर्ज केल्यानंतर ही कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरीक हवालदिल होऊन मागेल तितके पैसे देऊनसुध्दा हेलपाटे मारून काकुळतीला येतात. नागरीकांना सांगितलेल्या तारखेला येऊनसुध्दा नकला मिळत नाहीत. कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये कसलीही एकवाक्यता नसल्याने त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. नागरिकांची पिळवणूक होत असताना काही कमर्चारी व अधिकारी कधीही वेळेत उपस्थित नसतात. नागरीकांनी उलट विचारणा केल्यास दमबाजी करतात. भूमीअभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांना नेमून दिलेली काम व कर्तव्य बजावत नाहीत. संबंधित विभागाचे अधिकारी अर्थकारण सर्वसामान्यांची कामे करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा शिवसेनेच्या प्रदीप झणझणे यांनी केला आहे. कामकाजात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रदिप झणझणे, सुभाष जाधव, मच्छिंद्र भोसले, अभिजीत कदम, हेमंत सुतार, गणेश गायकवाड, जितेंद्र नाळे व शिवसैनिक यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget